बीड :ही महिला शेताच्या दाव्याची तारीख असल्याने 6 जानेवारी रोजी मुंबईहून वडवणी येथे आली होती. काम आटोपल्यानंतर गावातील काशिनाथ शेंडगे याच्यासोबत महामार्गालगत असलेल्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबली होती. यावेळी वडवणी तहसील कार्यालया बाहेर काम करणारा राजू उदगिरे आणि त्यासोबतच्या तहसील कार्यालयात कार्यरत कोपुरवाड नावाच्या व्यक्तीने पीडितेला घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे त्याचप्रमाणे पगार चालू करून देण्याचे आमीष दाखविले. पीडितेने आरोपींना महत्त्वाची कागदपत्रे, आधारकार्ड आणि 500 रुपये दिले. यानंतर तिला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगण्यात आले.
सरकारी दवाखान्यात नेले:पीडिता 9 जानेवारीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वडवणीला आली आणि राजू उदगिरे याला भेटली. तिने त्याला दिलेली कागदपत्रे आणि पैसे परत करण्याची मागणी केली. यानंतर उजगिरे तिला कर्मचारी कोपुरवाड याच्याकडे घेऊन गेला. चिंचवडच्या सरकारी दवाखान्यात जाऊन साहेबांची सही घेऊन येऊ, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर राजू उदगिरे आणि कोपुरवाड हे महिलेला घेऊन दवाखान्यात पोहोचले. परंतु, पीडितेकडे आधार कार्ड नसल्याने डॉक्टरांनी तिला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. आरोपींनी परतताना सायंकाळच्या सुमारास मधेच गाडी थांबविली आणि पीडितेला, तू चल माझ्यासोबत, मला तुझ्या सोबत संबंध करायचे आहेत असे सांगितले.