बीड- जिल्हा बँकेच्या विविध कार्यकारी सेवा संस्था मार्फत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडील कर्ज घेऊन ती बँकेच्या खात्यावर न भरता अपहार केल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे स्वतः बँक प्रशासनाने मला दिलेल्या उत्तरात अशा प्रकारची तफावत निदर्शनास आली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणात 500 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत या प्रकरणात तत्काळ संघटीत गुन्हेगारीचे कायदे लावून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे संस्थापक आणि आमदार विनायक मेटे यांनी केली. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बीड जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीत 500 कोटींचा घोटाळा.. विनायक मेटेंचा आरोप
बँकेने शेती व बिगर शेती कर्जासाठी एकूण 1 हजार 86 कोटी 9 लाखांचे कर्ज वाटप केले. मात्र, शासनाकडून देण्यात आलेला 2 टक्के प्रोत्साहनपर निधी शेतकऱ्यांना देण्यात आला नाही. बँकेकडे 3 जानेवारी 2020 अखेर एकूण 587 कोटी 9 लाख इतक्या ठेवी आहेत. बॅंकेच्या संचालक मंडळांनी यात घोळ करुन 500 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा केलेला आहे.
जिल्हा बँक कर्ज वसुली प्रकरणात 500 कोटींचा घोटाळा..
बँकेने शेती व बिगर शेती कर्जासाठी एकूण 1086 कोटी 9 लाखांचे कर्ज वाटप केले. मात्र, शासनाकडून देण्यात आलेला 2 टक्के प्रोत्साहनपर निधी शेतकऱ्यांना देण्यात आला नाही. बँकेकडे 3 जानेवारी 2020 अखेर एकूण 587 कोटी 9 लाख इतक्या ठेवी आहेत. बॅंकेच्या संचालक मंडळांनी यात घोळ करुन 500 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा केलेला आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करा, अन्यथा शिवसंग्राम तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मेटे यांनी दिला.