महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये 393 जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह तर 9 जणांचा मृत्यू - बीड कोरोना घडामोडी

कोरोनाचा फैलाव रोखला जात नाही. तोपर्यंत वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्याचे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले आहे.

बीड
बीड

By

Published : Apr 1, 2021, 7:31 PM IST

बीड- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 393 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 9 जणांचा कोरोनाच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव झालेल्या रुग्णांची संख्या 28 हजार एवढी असून कोरोनाचे सक्रिय रुग्ण 3 हजार एवढे आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील बँका, निमशासकीय कार्यालय व शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आदेशित केले आहे.

बीड जिल्हा आरोग्य विभागाने बुधवारी 2956 संशयितांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. याचा अहवाल गुरुवारी दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये 293 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मागील 12 ते 15 तासात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीतच बीड जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी केल्यानंतर देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी जिल्ह्यात तुटत नाही. ही बाब सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्कादायक आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर न पडणे अथवा आवश्यक कामासाठी घराबाहेर निघावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बँक कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक-

आतापर्यंत व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले होते. मात्र, आता बँकेतील कर्मचारी तसेच शाळा महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक यांनादेखील कोरोना चाचणी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाचा फैलाव रोखला जात नाही. तोपर्यंत वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्याचे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले आहे.

तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे-

बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामध्ये बीड तालुक्यात 127, अंबाजोगाई 65, आष्टी 45, धारूर 4, गेवराई 11, केज 33, माजलगाव 34, परळी 9, पाटोदा 26 तर वडवणी तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गुरुवारी आढळून आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड तालुका आघाडीवर-

गुरुवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्वाधिक कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण बीड तालुक्यात आढळून आले आहेत एकट्या बीडमध्ये 127 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सुरक्षित अंतरासह कोरोनाचे नियम पाळावेत. सध्या बीड जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. या दरम्यान नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details