बीड- गेवराई तालुक्यातील सीमेवरील एका गावात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने एका संशयिताने गेवराई रुग्णालयात धाव घेतली. तिथे प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्या व्यक्तीला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील 31 जणांना क्वारंटाईन केले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
बीडमध्ये कोरोना संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल; संपर्कातील 31 जण क्वारंटाईन - बीड कोरोना अपडेट्स
बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील 31 जणांना क्वारंटाईन केले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
बीडमध्ये कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयात दाखल; संपर्कातील 31 जण क्वारंटाईन
रविवारी रात्री उशिरापर्यंत त्या संशयिताचा अहवाल येणार असल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. सदर संशयिताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून संशयित व्यक्तीमध्ये कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसून असल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 31 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता या संशयित रुग्णाचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.