बीड- होमगार्ड नावनोंदणी प्रक्रियेसाठी उशिरा येणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ घालत आमची नाव नोंदणी करून घ्या, अशी मागणी केली. मात्र, नियमानुसार एक दिवस उशीर झाला असल्याने आता पुन्हा उशिरा आलेल्या २०० उमेदवारांना होमगार्ड नाव नोंदणी करता येणार नाही, अशी भूमिका बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी घेतली. नियमाप्रमाणे त्या २०० विद्यार्थ्यांना होमगार्ड नाव नोंदणी करता येणार नाही, असेही ते म्हणाले.
उशीर झाल्याने होमगार्ड नाव नोंदणीपासून २०० उमेदवार वंचित - Venkatesh Vaishnav
होमगार्ड नावनोंदणी सोमवार दिनांक २४ जूनपर्यंत असताना आज मंगळवार दिनांक २५ जून रोजी नावनोंदणीसाठी आलेल्या सुमारे २०० उमेदवारांना रोखण्यात आले.
शासनाने काढलेल्या निविदेतील जाहिरातीनुसार २४ जून रोजी होमगार्ड नाव नोंदणी प्रक्रिया सुरू होती. नोंदणी प्रमाणे इतर चाचणी करण्याचे काम घेण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये १ हजार ९४४ उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र, आज (मंगळवारी) २०० उमेदवार उशीरा आले होते. यामुळे त्यांना नाव नोंदणी करता आली नाही. २४ जून रोजी सकाळी ८ वाजता सांगितलेल्या ठिकाणी हजर राहण्याबाबत स्पष्ट उल्लेख जाहिरातीत केलेला आहे, असे असतानाही होमगार्ड नाव नोंदणी प्रक्रियेला एक दिवस उशिराने उमेदवार आले. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला. नियमाप्रमाणे दुसऱ्या दिवशी आलेल्या उमेदवारांना होमगार्ड नाव नोंदणी प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली आहे.