महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी बीडमधील २ अपघातात २ ठार - Beed latest news

वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातांपैकी अंबाजोगाई येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दत्ता ठोंबरे जागीच ठार झाले.

accidents
accidents

By

Published : Dec 31, 2020, 12:52 PM IST

बीड - सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळीच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातांपैकी अंबाजोगाई येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दत्ता ठोंबरे जागीच ठार झाले.

शरीराचे दोन तुकडे

सविस्तर माहिती अशी, की अंबाजोगाई ते अंबा साखर कारखाना रोडवरील जोगाईवाडी चौकाजवळ अज्ञात वाहनाने जॉगिंग करत असताना दत्ता ठोंबरे यांना चिरडले. अपघात एवढा भीषण होता, की अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दत्ता यांच्या शरीराचे दोन भाग झाले. प्राथमिक माहितीनुसार मृत दत्ता पाण्याच्या टाकीजवळील रहिवासी असून टिळक नगर येथे पिठाच्या चक्कीचा व्यवसाय आहे. माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

परळी ते धर्मापुरी रोडवरील घटना

गुरुवारी सकाळीच अपघाताची दुसरी घटना परळी ते धर्मापुरी रोडवर घडली. बस व मोटार सायकलच्या अपघातात राजाभाऊ बाबुराव राठोड (वय 38, रा. खोडवा सावरगाव तांडा, ता. परळी) हे ठार झाले असून त्यांच्यासोबतचे बळीराम टिकाराम राठोड हे जखमी झाले असून त्यांना परळी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. राजाभाऊ हे परळीवरून धर्मापुरीकडे असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. गुरुवारी सकाळी सहाच्या दरम्यान घडली.

आजच्या अपघाताच्या तीन विविध घटना

पुण्यातील हडपसर परिसरात आज सकाळच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला ट्रकने धडक दिली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि दोन मुले जखमी झाली आहेत. दुसऱ्या घटनेत नागपूर हिंगणा मार्गावरील राजीवनगर येथे भरधाव टिप्परच्या धडकेत एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव टिप्परने शिक्षकाच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. तर तिसरी घटना कराडमधील आहे. जीमला निघालेला दुचाकीस्वार तरूण अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाला. कराड-पाटण मार्गावरील विजयनगर (ता. कराड) येथे बुधवारी पहाटे ही घटना घडली.

ABOUT THE AUTHOR

...view details