बीड - दिवसेंदिवस बीडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढच चालली आहे. अशातच आज 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा बीड जिल्हा रुग्णालयात तर दुसरा बीड शहरातील रहिवासी असलेल्या व्यक्तीचा औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 14 वर पोहोचला आहे.
बीडमध्ये कोरोनाचे 2 बळी; एकाचा औरंगाबादमध्ये तर एकाचा बीडमध्ये मृत्यू - बीड लेटेस्ट अपडेट
दिवसेंदिवस बीडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढच चालली आहे. अशातच आज 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा बीड जिल्हा रुग्णालयात तर दुसरा बीड शहरातील रहिवासी असलेल्या व्यक्तीचा औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यात एकूण 331 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या असून, यापैकी 175 रुग्ण बरे झाले आहेत. तर 14 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून 144 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बीड शहरातील रहिवासी असलेल्या एकाच उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला. अवघ्या काही तासानंतर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा दुपारी 4 वाजता मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बीडमध्ये मृत्यू झालेली ती महिला गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील आहे. या ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेवर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.