माहिती देताना तत्वशील कांबळे बीड: बीडपासून जवळच असलेल्या खापर पांगरी गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा नराधम तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने सतत बळजबरीने अत्याचार केल्याने पीडिता ही 7 महिन्याची गर्भवती राहिली. या गर्भवती पीडितेची बीड -छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये डिलिव्हरी करण्यात आली.
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: बीडपासून जवळच असणाऱ्या गावामध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात करणारी टोळी सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नराधम आरोपी रणजित शिवदास शेंडगे याच्यासह त्याला साथ देणारा भाऊ पवन शिवदास शेंडगे, जालिंदर खामकर, योगेश शेंडगे यासह ९ जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार, पोक्सो तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दबाव टाकून गावातून बाहेर काढले : विशेष म्हणजे हा नराधम आरोपी आणि त्याचे नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाहीत. या पीडित मुलीच्या कुटुंबाला गावातून पुण्याला जाऊन राहा, असा दबाव देखील टाकला. त्यानंतर नराधम आरोपी पीडित कुटुंबाला पुणे येथे सोडून आला. दरम्यान हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या मामाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात, पीडितेसह तिचे आई-वडील गायब असल्याची तक्रार दिली. तर पीडितेच्या चुलत भावाने बहिणीवर झालेल्या अत्याचाराची माहिती पत्राद्वारे राज्य महिला आयोगाकडे केली. यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. दबाव टाकून गावातून बाहेर नेऊन सोडलेल्या पीडित कुटुंबाला, चाईल्ड लाईनचे सदस्य तत्त्वशील कांबळे यांच्यासह पोलिसांनी 15 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर शोधले.
हेही वाचा -
- Raigad Crime रायगडच्या महिलेवर साताऱ्यात सामूहिक अत्याचार माजी आमदार विवेक पंडित यांनी घेतली दखल
- Mumbai Crime News: धावत्या लोकलमध्ये विनयभंगाचे सत्र सुरू; तरूणाने अश्लील चाळे आणि शिवीगाळ करत केला तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्न
- Buldana Crime : सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या