महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Girl Raped : 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार - Kidnapped Minor Girl sexually assault

बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात ( Kidnapped Minor Girl sexually assault ) आला. ही धक्कादायक अन संतापजनक घटना बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. प्रमोद सोमनाथ सलगर रा. मुंगी ता. धारुर जि. बीड असे नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

girl kidnapped and sexually assault
मुलीवर अत्याचार

By

Published : Nov 5, 2022, 12:46 PM IST

बीड -बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात ( Kidnapped Minor Girl sexually assault ) आला. ही धक्कादायक अन संतापजनक घटना बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. प्रमोद सोमनाथ सलगर रा. मुंगी ता. धारुर जि. बीड असे नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.


पीडिता ही आजी आजोबांच्या घरी : या विषयी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून, 13 वर्षीय पीडिता ही आजी आजोबांच्या घरी होती. दि. 22 ऑक्टोबर रोजी आजी आजोबाच्या राहत्या घरातून, आरोपी प्रमोद सलगर याने पीडितेला पळवून नेले. सदरील फिर्यादीवरून कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला होता.

वेळोवेळी शारीरीक संबंध :दरम्यान यातील पिडीता ही पोलिसांच्या तपासात मिळून आली आहे. तिने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, प्रमोद सलगर याच्या व माझ्यामध्ये वेळोवेळी शारीरीक संबंध झाले आहे. पीडितेच्या सदर जबाबावरुन बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यात, नमूद गुन्हयात 376 (2) (एन), 376 (2) (जे), 120 (ब) भादंवि सह कलम 4, 6, 17 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 सह कलम 9, 10 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम वाढ करण्यात आले ( Minor Girl Kidnapped ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details