आष्टी :आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील ३८ आणि सांगवी पाटण येथील १ असे एकूण ३९ भाविक ५ जुलै रोजी अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) गेले होते. अमरनाथ गुहेजवळ अचानक ढगफुटी (11 devotees who went on a pilgrimage got stuck) होऊन पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली. त्यामुळे यात्रेसाठी गेलेले ११ भाविक बाबा बर्फाणी यांच्या गुहेजवळ अडकले. तर २८ भाविक हे खाली असलेल्या बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप आहेत.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून ३९ भाविक अमरनाथ बाबा बर्फाणी यांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यातील २८ भविक बालटल येथील सैनिक तंबूत सुखरूप आहे. तर, ढगफुटी होऊन पूरग्रस्तस्थिती निर्माण झाल्याने त्यातील ११ जण हे वरतीच अडकले होते. अडकलेल्या ११ जणांशी संपर्क झालेला आहे. भारतीय सैनिकांच्या एनडीआरएफ जवानांच्या मदतीने त्यांना सुरक्षित स्थळी आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अडकलेल्या ११ जणांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने खाली बालटल या ठिकाणी आणण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच आ.सुरेश धस यांनी अडकलेल्या भावीकांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांना धीर देत काही मदत लागल्यास तात्काळ संपर्क करावा असे आ. सुरेश धस यांनी सांगितले.