बीड -दुचाकी व स्कार्पिओच्या समोरासमोर झालेल्या धडकेच एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील नवा मोंढा मार्गावर घडली. दुचाकीवरील दोघांपैकी एक जण जागीच ठार झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी असून, त्याच्यावर माजलगाव ग्रामीण रूग्णालयात सुरू आहेत. ही घटना आज (शुक्रवारी) रात्री आठ वाजता घडली.
बीडमध्ये स्कार्पिओची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू - बीड अपघात न्यूज
दुचाकी व स्कार्पिओच्या समोरासमोर झालेल्या धडकेच एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील नवा मोंढा मार्गावर घडली.
बीडमध्ये स्कार्पिओची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू
अपघात होताच घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस जमादार शरद पवार, राऊत यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे.