महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन तरूणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट - पोलीस

सुरज हा संग्रामनगर येथील रेल्वे रुळाजवळील एका ओट्यावर बसला होता. तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या काही लोकांना त्याच्या हावभावावरून तो तणावात असल्याचे जाणवले. याबाबत नागरिकांनी एस.पी.ओ. श्रीमंत गोरडे यांना माहिती दिली. मात्र, गोरडे तेथे पोहोचेपर्यंत समोरून रेल्वे येत होती. त्यावेळी आपल्याला वाचविण्यासाठी नागरिक येत असल्याचे पाहून सुरजने रेल्वेच्या दिशेने पळ काढला आणि रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली.

धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन तरूणाची आत्महत्या

By

Published : May 16, 2019, 3:39 PM IST

औरंगाबाद - संग्रामनगर येथे १९ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. सुरज गंगाधर भांडारे (रा. सातारा परिसर, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

औरंगाबादमध्ये धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन तरूणाची आत्महत्या

आज सकाळी सुरज हा संग्रामनगर येथील रेल्वे रुळाजवळील एका ओट्यावर बसला होता. तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या काही लोकांना त्याच्या हावभावावरून तो तणावात असल्याचे जाणवले. याबाबत नागरिकांनी एस.पी.ओ. श्रीमंत गोरडे यांना माहिती दिली. मात्र, गोरडे तेथे पोहोचेपर्यंत समोरून रेल्वे येत होती. त्यावेळी आपल्याला वाचविण्यासाठी नागरिक येत असल्याचे पाहून सुरजने रेल्वेच्या दिशेने पळ काढला आणि रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी थोडे अगोदर पोहोचलो असतो, तर तरुणाचे समुपदेशन करून त्याचा जीव वाचविला असता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी श्रीमंत गोरडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details