औरंगाबाद- कन्नड तालुक्यात कुट्टी मशीनचा पट्टा तुटून लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विटा येथे ट्रॅक्टरने मक्याच्या चाऱ्याची कुट्टी करत असताना पट्टा तुटुन चाकाचा तरुणाच्या कंबरेला जोरदार मार लागला. या घटनेत तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले. एकनाथ तुळशीराम भोजणे (वय २२ वर्ष) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी घडली.
कन्नड़ तालुक्यातील विटा येथे विचित्र अपघात, युवकाच्या शरीराचे झाले दोन तुकडे
कन्नडच्या विटा गावात मक्याच्या चाऱ्याची कुट्टी करताना पट्टा तुटून मशीनचे चाक लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये मृत तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले.
एकनाथ भोजणे या तरुणाने एक महिन्यापुर्वी चारा कुट्टी मशीन घेतले होते. ट्रॅक्टर घेतल्यापासून दररोज चाऱ्याची कुट्टी करण्याचे काम सुरू होते. रविवारी विटा येथील कृषि सहाय्यक प्रमोद पुरी यांच्या शेतात मक्यीची कुट्टी करत असताना अचानक मशीनचा पट्टा तुटला. ट्रॅक्टर चालु असल्याने कुट्टी मशीनच्या चाकाचा कंबरेला एवढा चोरात मार लागला काही क्षणातच एकनाथ भोजणे या तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले. त्याचा जागीत मुत्यु झाला.
मशीनची गतीच एवढी जोरात होती एक चाकाने जीव घेतला तर दुसरे चाक तब्बल अर्धा किलोमीटर वर जाऊन पडले. सदरील मुतदेह शवविच्छेदनासाठी औराळा येथील प्राथमिक केंद्रात आण्यात आला. वैद्यकीय अधिकारी प्रदिप कांबळे, डॉ. परेश चव्हाण यांनी शवविच्छेदन करुन मुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.