महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेयसीला भेटवस्तू घेण्यास आईने पैसे न दिल्याने युवकाची आत्महत्या - lover

१८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सय्यद फैजान एजाजुद्दीन असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

सय्यद फैजान एजाजुद्दीन

By

Published : Mar 2, 2019, 1:27 PM IST

औरंगाबाद- प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आईने पैसे न दिल्याने एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सय्यद फैजान एजाजुद्दीन असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबादमधल्या किलेअर्कमध्ये ही घटना घडली. फैझानचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. तो नेहमी तिला महागड्या वस्तू भेट करायचा. शुक्रवारी रात्री प्रेयसीला भेटवस्तू घेण्यासाठी त्याने आईकडे पैशाची मागणी केली. मात्र, आईने एवढे पैसे कुठे खर्च करतो अशी विचारणा करीत त्यास खडसावले व पैसे देण्यास नकार दिला. आई पैसे देत नसल्याने रागावलेल्या फैझानने त्याच्या खोलीतील छताच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक संजय बहुरे करीत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details