औरंगाबाद- आज जागतिक वन्यजीव दिवस. प्राणीमित्र मोठ्या उत्साहात आजचा दिवस साजरा करतात. यानिमित्त ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्याशी खास बातचीत केली. माणसाने वन्यजीवांसाठी काही तरी करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत बैजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.
World wildlife day : वन्यजीवांशी जवळीक करा - बैजू पाटील - बैजू पाटील
माणसाने वन्यजीवांसाठी काही तरी करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत बैजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.
३ मार्चला जागतिक वन्यजीव दिवस म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सर्वत्र निसर्गाची हानी होत असल्याने वन्यजीव धोक्यात आल्याचे मत बैजू पाटील यांनी व्यक्त केले. प्राणी आणि पक्षांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. जंगल कमी होत असल्याने वन्यजीव अडचणीत आले आहे. त्यामुळे जंगल वाचली पाहिजे जेणेकरून वन्यजीवांचे संरक्षण शक्य होईल, असेही बैजू पाटील यांनी सांगितले. अख्खे विश्व त्यांचे असते. मात्र, त्यांच्या गरजा काहीच नसतात, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असते. वन्यजीव आपल्याला खुप काही शिकवून जातात, त्यामुळे त्यांच्याशी जवळीक केली पाहिजे, असेदेखील बैजू पाटील यांनी सांगितले.