महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालमत्तेच्या वादातून महिलेला नग्न करुन मारहाण

वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या नावावर असलेली १२०० स्क्वेअर फुटाची मालमत्ता पीडितेच्या आईच्या नावावर झाली. वारसदार म्हणून पीडित महिलेचे आणि त्यांच्या बहिणीचे नाव कागदोपत्री आले. मात्र, भावाची मालमत्ता मिळवण्यासाठी काका आणि त्यांचे कुटुंबीय त्रास देत असून याच वादातून नग्न करून मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

पीडित महिला

By

Published : Feb 22, 2019, 1:12 PM IST

औरंगाबाद - मालमत्तेच्या वादातून महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना जानेवारीत घडली होती. मात्र, पीडित महिलेच्या भाच्याने या घटनेचे व्हिडिओ माध्यमांना दिल्याने ही घटना समोर आली.

सिल्लोडच्या सराफा बाजारात पीडित महिलेच्या वडिलांच्या मालकीची १२०० स्क्वेअर फुटाची जमीन आहे. वडिलांचे निधन झाल्यावर ही मालमत्ता पीडितेच्या आईच्या नावावर झाली. वारसदार म्हणून पीडित महिलेचे आणि त्यांच्या बहिणीचे नाव कागदोपत्री आले. मात्र, भावाची मालमत्ता मिळवण्यासाठी काका आणि त्यांचे कुटुंबीय त्रास देत असून याच वादातून नग्न करून मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

या प्रकरणानंतर महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. इतकेच नाही तर मारहाण केलेल्या काका आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पीडित महिलेवर, बहिणीवर आणि आईवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेचे कुटुंबीय आणि काकाच्या कुटुंबीयांच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details