औरंगाबाद- शहरात एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सदरील महिला असेंफिया कॉलनीत वास्तव्यास होती. दहा दिवसांपूर्वी महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
औरंगाबादेत 95 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, बळींची संख्या 12 वर
कोरोनाचे उपचार घेणाऱ्या 95 वर्षीय महिलेला हृदयरोग, फुप्फुसासंबंधी आजार होते. 27 एप्रिलला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
कोरोनाचे उपचार घेणाऱ्या 95 वर्षीय महिलेला हृदयरोग, फुप्फुसासंबंधी आजार होते. 27 एप्रिलला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील कोरोनाचा हा पहिला बळी असून कोरोनाच्या एकूण बळींची संख्या 12 वर पोहचली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रोज सरासरी किमान तीस नवीन रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी सकाळी देखील 17 नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या 373 वर गेली आहे. रोज नवीन हॉटस्पॉट आढळून येत आहेत. त्यामुळे आता महानगर पालिकेच्या वतीने काही टीम तयार करून थेट हॉटस्पॉटमध्ये जाऊन तपासणी करायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केले.