औरंगाबाद-फ्लॅटचे बांधकाम सुरू असताना शेजाऱ्यांकडून सतत येणाऱ्या व्यत्ययाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे.ही घटना सोमवारी बाबा पेट्रोल पंम्प जवळील म्हाडा कॉलनी येथे घडली.उषा विजय गायकवाड ( वय - 54, रा. म्हाडा कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. ओढणीच्या सहाय्याने या महिलेने गळफास घेतला.
एक वर्षापासून गायकवाड यांच्या फ्लॅटचे बांधकाम सुरु आहे. त्यांना जवळच राहणारे काही जण बांधकामावरुन सतत जाब विचारत. त्यांना मानसिक त्रास देत होते. गायकवाड यांनी अनेकदा बांधकामविषयी शेजाऱ्यांची समजूत घालण्याचेही प्रयत्न केले.