महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरीर सुखासाठी नकार दिल्याने महिलेला जिवंत जाळले - aurangabad crime

शरीरसुखासाठी नकार दिल्याने एका नराधमाने चक्क महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यामधील पीडित महिला 95 टक्के भाजली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

woman burnt alive in aurangabad
शरीर सुखासाठी नकार दिल्याने महिलेला जिवंत जाळले

By

Published : Feb 5, 2020, 10:30 AM IST

औरंगाबाद- शरीरसुखासाठी नकार दिल्याने एका नराधमाने चक्क महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. अंधारी गावात हा धक्कादायक प्रकार घडला असून संबंधित महिला 95 टक्के भाजली आहे. सध्या महिलेवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

शरीर सुखासाठी नकार दिल्याने महिलेला जिवंत जाळले

संतोष मोहिते असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रविवारी(2 फेब्रुवारी) रात्री 11 वाजेच्या सुमारास आरोपी संतोष पीडित महिलेच्या घरात आला. यानंतर त्याने पीडितेला शरीरसुखाची मागणी केली.

मात्र, महिलेने नकार दिल्याने संतोषचा पारा चढला. त्याने घरातील रॉकेल पीडितेच्या अंगावर ओतून तिला जिवंत जाळले. आरडाओरड ऐकून शेजारी राहणाऱ्या पीडितेच्या जावयाने घराकडे धाव घेतली. यानंतर आरोपीने जावयाला पाहून पोबारा केला.

तातडीने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या जबाबावरून संबंधित आरोपीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून त्याला अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details