महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान; हरभऱ्यावर अळीचा प्रादूर्भाव - शेतकरी आत्महत्या

मागील दहा ते बारा दिवसांपासून ढगाळ वातावरण व दाटधुक्यांमुळे रब्बी पिकासाठी प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे. कोरडवाहू हरभाऱ्याला फुलगळ व घाटेअळी तर ज्वारी पिकावर पाने करपणे, पानावर चिकटा पडणे त्याचप्रमाणे लष्करी अळीचा प्रादूर्भाव होत आहे.

winter-crop-loss-in-paithan
हरभऱ्यावर अळीचा हल्ला

By

Published : Jan 5, 2020, 9:29 PM IST

औरंगाबाद - पैठण येथील लोहगाव, शेवता परिसरात ढगाळ वातावरण व धुक्यामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहेत. पैठण तालुक्यातील कोरडवाहू व बागायती गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. मात्र, पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान; हरभऱ्यावर अळीचा हल्ला

हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांना एकर आणि हेक्टरमधला फरक कळला नसता तर... '

मागील दहा ते बारा दिवसांपासून ढगाळ वातावरण व दाटधुक्यांमुळे रब्बी पिकासाठी प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे. कोरडवाहू हरभाऱ्याला फुलगळ व घाटेअळी तर ज्वारी पिकावर पाने करपणे, पानावर चिकटा पडणे त्याचप्रमाणे लष्करी अळीचा प्रादूर्भाव होत आहे. गव्हाची वाढ खुंटून अकाली ओंब्या आल्याचे दिसून येत आहे. विविध रोगांवर उपाययोजना करण्यासाठी शेतकरी आपल्या कुवतीप्रमाणे औषध फवारणी करत आसला तरी प्रशासकीय स्तरावर याबद्दल उदासिनता आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे वातावरण दिसत आहे. मात्र, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा - 'या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणी काही करावं लागणार नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details