गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यातील ममदापूर, बगडी, कानडगाव, नेवरगाव, जामगावसह गंगापूर तालुक्यात अनेक ठिकाणी अचानक अवकाळी वादळी वारा, मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पाऊस, गारपिटीने शेतकऱ्याची तारांबळ उडाली. या पावसाने रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेल्या गहू, कांदा, हरभरा, मका, टोमॅटो व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका पिकांना बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या नुकसानग्रस्त पिकांची प्रशासनाने तत्काळ पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हातातोंडाशी आलेला गहू, कांदा, हरभरा, टॉमेटो, पिकांचे मोठे नुकसान