औरंगाबाद- पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, मराठवाड्यात अद्यापही पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे मराठवाड्यात टँकरची संख्या कमी होण्याऐवजी जुलै महिन्यात ही संख्या 137 ने वाढली आहे.
ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात २ हजार टँकरने पाणीपुरवठा - टँकर
मराठवाड्यातील 1 हजार 583 गावांमध्ये 2 हजार 105 टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये शासकीय 62 तर 2 हजार 43 खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात 5 हजार 265 विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत.
ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात २ हजार टँकरने पाणीपुरवठा
मराठवाड्यातील 1 हजार 583 गावांमध्ये 2 हजार 105 टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये शासकीय 62 तर 2 हजार 43 खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात 5 हजार 265 विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत. मराठवाड्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पाऊस पडला तरच टँकरच्या संख्येत घट होईल. पावसाने पुन्हा उशीर केल्यास टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती टँकर -
- औरंगाबादेत - 707
- जालना - 350
- परभणी - 68
- हिंगोली - 46
- नांदेड - 137
- बीड - 418
- लातूर - 107
- उस्मानाबाद - 225