महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा - मराठवाडा पाणीप्रश्न

नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतून सुरू असलेल्या विसर्गानंतर गुरूवारी दुपारी चार वाजता जायकवाडी धरणातील मृत पाणीसाठा जीवंत पाणीसाठ्यात रूपांतरीत झाला आहे. जायकवाडीचा साठा चार टक्क्यांवर गेल्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जायकवाडी धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात वाढ

By

Published : Aug 1, 2019, 10:54 PM IST

औरंगाबाद - नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतून सुरू असलेल्या विसर्गानंतर गुरूवारी दुपारी चार वाजता जायकवाडी धरणातील मृत पाणीसाठा जिवंत पाणीसाठ्यात रूपांतरीत झाला आहे. जायकवाडीचा साठा चार टक्क्यांवर गेल्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जायकवाडी धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात वाढ

अनेक महिन्यांपासून जायकवाडी धरण मृतसाठ्यात होते. गेल्या सहा दिवसांपासून नाशिक व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्री आठ वाजता जायकवाडी प्रकल्पात पाणलोट क्षेत्राच्या भागातील प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गामुळे ४५ हजार क्युसेक पाण्याची आवक झाली. धरणाचा एकूण पाणीसाठा 841.780 दलघमी(दश लक्ष घन मिटर) असून जिवंत पाणीसाठा 103.674 दलघमी इतका झाला आहे.

१०५ टीएमसी क्षमता असलेल्या नाथसागर जलाशयात नाशिकच्या नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून मंगळवारी सोडण्यात आलेले ५८ हजार क्युसेक पाणी बुधवारी नाथसागर जलाशयात आले. बुधवारी सकाळी ११च्या सुमारास आणखी ५१ हजार ५१० क्युसेक पाणी धरणात दाखल झाले. मात्र दुपारनंतर पाण्याचा विसर्ग कमी झाला होता. नाशिक भागात सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात होत असलेली पाण्याची आवक मराठवाड्याच्या नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details