औरंगाबाद - वडगाव कोल्हाटी परिसरात 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून नराधमाने तिच्या ओठांचा चावा घेतल्याने तिचे ओठ तुटले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नराधमाचा सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी फरार - aurangabad ghati hospital
7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वडगाव कोल्हाटी परिसरात घडली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये मुलगी आपल्या वडिलांसोबत झोपली होती. गुरुवारी रात्री एकच्या सुमारास एका अज्ञाताने तिला उचलून नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी असून तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी नराधमाने चिमुकलीच्या ओठाचा चावा घेतल्याने तिचे ओठ तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येत आरोपीचा शोध घेतला असता नराधम फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे मात्र, पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.