महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raosaheb Danve Statement लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्र, रावसाहेब दानवे यांचे संकेत

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve Statement ) यांनी केलेली वक्तव्य सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होतात. त्यामुळे रावसाहेब दानवे हे बोलताना काळजी घेतात. फुलंब्री येथील सरपंचांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ( Lok Sabha And Vidhan Sabha Election ) एकाचवेळी होतील असे संकेत दिले. मात्र हे वक्तव्य कुठेही रकॉर्ड होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. दरम्यान त्यांना याबाबत माहिती कशी याबाबत आता शंका कुशंका करण्यात येत आहेत.

Union Minister Raosaheb Danve
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

By

Published : Dec 27, 2022, 1:26 PM IST

औरंगाबाद - भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve Statement ) आपल्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. असेच वक्तव्य त्यांनी फुलंब्री मतदार संघातील सरपंच सत्कार सोहळ्यात केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ( Lok Sabha And Vidhan Sabha Election ) एका वेळीच होतील, असे संकेत त्यांनी आपल्या भाषणातून दिले. मात्र हे वक्तव्य कुठेही रेकॉर्ड होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली.

इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार प्रवेशभाजप तर्फे राज्यातील नवनिर्वाचित सरपंच सत्कार सोहळे आयोजित केले जात आहेत. फुलंब्री येथे अशाच मेळाव्यात बोलताना भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister Raosaheb Danve Statement ) म्हणाले, की हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका ( Lok Sabha And Vidhan Sabha Election ) होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य दानवे यांनी केले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दानवे यांना आधीच ही माहिती कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्हिडिओ बाहेर येणार नाही याची घेतली काळजीकेंद्रीय मंत्रीरावसाहेब दानवे ( Union Minister Raosaheb Danve Statement ) आणि त्यांचे वक्तव्य राज्यात चर्चेचा विषय ठरतो. अनेक वेळा वेगवेगळ्या सभा - कार्यक्रमांमध्ये त्यांनी केलेले वक्तव्य सोशल मीडियावर चांगले चर्चेला असतात. फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित सरपंचांच्या मेळाव्यात करत असलेले भाषण आणि वक्तव्य कुठेही बाहेर जाऊ नये, यासाठी त्यांनी खबरदारी घेत, कोणालाही चित्रीकरण करण्यास परवानगी दिली नाही. इतकेच नाही तर एक जण चित्रीकरण करत असताना त्याला दानवे ( Lok Sabha And Vidhan Sabha Election ) यांनी अडवले. माझे वक्तव्य सोशल मीडियावर कसेही चालवतात असे म्हणत त्यांनी चित्रीकरण थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ( Lok Sabha And Vidhan Sabha Election ) एकत्र होतील, असा उल्लेख त्यांनी केला. इतकेच नाही तर भाजपमध्ये केंद्रीय मंत्री पदापर्यंत येण्यासाठी किती कष्ट केले, याची अनेक उदाहरणे त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details