औरंगाबाद- शहरासह जिल्ह्यातील दुचाकी चोरणाऱ्या दुकलीस सिडको पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. अशोक मानसिंग तामचिकर, प्रदीप बाबुराव जाधव असे आरोपींची नावे आहेत.
औरंगाबादेत दुचाकी चोरणाऱ्या दुकलीला अटक; १९ दुचाकी जप्त - औरंगाबाद
काही दिवसांपूर्वी सिडको परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली होती. त्या दुचाकीचा शोध घेत असताना पोलिसांनी नारेगावमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता दोघांनीही दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरासह जिल्ह्याभरातील ग्रामीण भागात दुचाकी चोरांनी थैमान घातले आहे. एका दिवसाआड विविध भागातून दुचाकी चोरी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, हे दुचाकी चोर पोलिसांच्या हाती लागत नव्हते. काही दिवसांपूर्वी सिडको परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली होती. त्या दुचाकीचा शोध घेत असताना पोलिसांनी नारेगावमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, दोघांनीही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तब्बल १९ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी सांगितले.