औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील खामगाव येथे आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे. खामगाव येथे धरण तलावात धोंड्याचा महिना असल्यामुळे 8 ते 10 महिला दररोज अंघोळीला जात होत्या. यावेळी संबंधित घटना घडली आहे.
औरंगाबादमध्ये तलावात आंघोळीसाठी गेलेल्या बहिणी बुडाल्या...दोघींचा मृत्यू
कन्नड तालुक्यातील खामगाव येथे आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे. खामगाव येथे धरण तलावात धोंड्याचा महिना असल्यामुळे 8 ते 10 महिला दररोज अंघोळीला जात होत्या. यावेळी संबंधित घटना घडली आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धरण-तलावात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. या दोन्ही बहिणी पोहत असताना हा प्रकार घडलाय. आरती कैलास कवडे (वय- 22) आणि ऋतुजा शिवाजी कवडे (वय - 18) असे बुडालेल्या बहिणींचे नाव आहे. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गाळात पाय फसला; आणि त्यामुळे दोघीही बुडाल्या.
ही घटना सोबत असलेल्या महिलांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना बोलावून घेतले. यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. एकाच घरातील दोघींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.