महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत एकाच दिवशी कोरोनाचे दोन बळी, मृतांची संख्या पंधरावर - औरंगाबादेतील कोरोनाबाधितांची संख्या

सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे ६१ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ६१९ वर पोहोचली आहे. तर, जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. सकाळी मुकुंदवाडी येथील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर पुंडलिकनगर येथील रुग्णाचाही मृत्यू झाल्याचे सायंकाळी समोर आले.

corona patients died on monday in aurangabad
औरंगाबादेत कोरोनाचा आणखी एक बळी

By

Published : May 12, 2020, 8:31 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. सकाळी मुकुंदवाडी येथील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर पुंडलिकनगर येथील रुग्णाचाही मृत्यू झाल्याचे सायंकाळी समोर आले. पुंडलिकनगर येथील ५८ वर्षीय रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा शहरातील कोरोनाचा पंधरावा बळी ठरला आहे.

सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे ६१ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ६१९ वर पोहोचली आहे. पुंडलिकनगर येथील ५८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयातून घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. रुग्ण फुफ्फुसाच्या टीबी आजाराने ग्रस्त होता. शिवाय त्यांना मेंदुचा टीबी, हायड्रोकॅफॅल्स मानसिक आजार व झटक्याचा आजार होता.

नऊ मे रोजी जिल्हा रुग्णालयात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी ४.३० मिनिटांनी त्यांना तीव्र झटका आल्याने तसेच कोरोनाने आणि दोन्ही फुफ्फुसांच्या न्युमोनियामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ६४ टक्के कमी झाले. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वास दिला होता. परंतु, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यु झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details