औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील चापानेर येथे आज सकाळी स्टेट बँक ऑफ इडिया ही बँक चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी फिंगर प्रिंट व डॉग स्कॉडला पाचारण केले. सुदैवाने तिजोरी फोडण्यात यश न आल्याने रोकड सुरक्षित राहिली.
औरंगाबादेत एसबीआय बँक फोडण्याचा प्रयत्न चापानेर येथील मुख्य रस्त्यावर असलेली स्टेट बँक ऑफ इडिया बँकेचा पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बँकेतील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यावर पांढरी चिकटपट्टी लावली. त्यानंतर चोरट्यांनी बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. कटरने व रॉडने तिजोरीवर वार केले, तरीदेखील चोरट्यांना तिजोरी फोडण्यात यश आले नाही. बँकेतील कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकले असून, बँकेतील रोख रक्कम पळवण्यात चोरट्यांना यश आले नाही. चोरट्यांनी जाताना सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळविला. ही घटना आज सकाळी बँक उघडण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधीकार्यांना माहिती दिली. बँक अधीकार्यांना तत्काळ कन्नड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधीकार्यांना घटनास्थळी भेट देऊन फिंगर प्रिंट तज्ज्ञ व डॉग स्कॉडला पाचारण केले. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.