औरंगाबाद - ट्रकमध्ये (हायवा) भरलेला मुरुम रिकामा करीत असताना ३३ के.व्ही.च्या तारेला ट्रकचा स्पर्श होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी वैजापुरातील इंगळे वस्ती येथे घडली. भानुदास रंगनाथ इंगळे (वय ४५ रा. वैजापूर) असे मृत चालकाचे नाव आहे.
विजेच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू - driver
इंगळे वस्ती परिसरातील हायवामधील मुरूम रिकामा करीत असताना वरून गेलेल्या ३३ के.व्ही.च्या विजेच्या तारेला ट्रॉलीचा स्पर्श झाला. त्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला.
इंगळे वस्ती परिसरातील गट क्रमांक २०७ मध्ये इंगळे हे (एम एच २० ए.टी. ४६७८) या हायवामधील मुरूम रिकामा करीत असताना वरून गेलेल्या ३३ के.व्ही.च्या विजेच्या तारेला ट्रॉलीचा स्पर्श झाला. ट्रकचा वायरला स्पर्श होताच ट्रकचे टायर फुटले, त्यानंतर ट्रकने पोट घेतला. टायर फुटल्याच्या आवाजाने नागरिकांनी ट्रककडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत भानुदास इंगळे यांचा मृत्यू झाला होता.
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वीजवितरण विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. भानुदास इंगळे यांच्या मृत्यू प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.