औरंगाबाद -कृत्रीम पावसाच्या प्रयोगाला अखेर मुहूर्त लागला आहे विभागीय आयुक्तालयात आावश्यक सी डॉप्लर रडार बसवून कार्यान्वित करण्यात आला असून आज शुक्रवारपासून या प्रयोगाची चाचणी केली जाणार आहे. पुढील काही दिवस कृत्रीम पावसाचे नियोजनबद्ध प्रयोग केले जातील अशी माहिती सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा भारतीय हवामान विभागाचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर जी.आर. कुलकर्णी यांनी दिली.
मराठवाड्यात तब्बल दीड महिन्यानंतर कृत्रीम पावसाला मुहूर्त; आज पहिला प्रयोग विभागीय आयुक्त कार्यालयावरील सी डॉप्लर रडार कार्यान्वित करून येथील तंत्रज्ञ, अधिकारी,कर्मचाऱ्यांची मुंबईहून आलेल्या शास्त्रज्ञांनी गुरुवारी कार्यशाळा घेतली. त्यानंतर डॉक्टर कुलकर्णी, हवामान विभागाचे केयास होसाळीकर यांनी पत्रकार परिषदेत या प्रयोगासंबंधी माहिती दिली. यावेळी तज्ञ श्रीरंग दत्त कामत यांची उपस्थिती होती. 23 मे रोजी शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर तब्बल सुमारे दीड महिन्यानंतर या प्रयोगाला मुहूर्त लागला आहे शुक्रवारपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ढगांचा अंदाज घेऊन पाऊस पाडण्याबाबतचा निर्णय रोज सकाळी ११ वाजता होईल. तिघा तज्ज्ञांची समिती हा निर्णय घेईल. ढगांची परिस्थिती कशी आहे, कोणत्या ढगातून पाऊस पडू शकतो, याचा दररोज अभ्यास झाल्यानंतरच निर्णय होईल.आणि त्यासाठी रसायनांसह विमान उड्डाण घेईल. औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, मुंबई व पुणे येथील रडारची मदत घेतली जाणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.
एका तास कृत्रीम पाऊस पाडण्याच्या यशस्वी चाचणीनंतर पुढचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यानंतर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये आपल्याकडे पाऊस पडतो आणि पडला नाही तर पाणीदार ढग आकाशात असतात. त्यामुळे आपण पुढील ५२ दिवस म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत हा प्रयोग करू शकतो आणि त्यानंतर ही यंत्रणा आपण परतीच्या पावसासाठी ठेवू असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
यापूर्वी कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले, तेव्हा किती पाऊस पडला यावरून मतभेद होते. कारण तेव्हा मोजमाप यंत्रे कमी होती. परंतु आता मराठवाड्यात प्रत्येक सर्कलमध्ये मोजणी केंद्र आहे. त्यामुळे प्रयोगामुळे किती पाऊस पडला हे समजू शकेल, असा दावाही डॉ. कुलकर्णी यांनी केला.