औरंगाबाद :गंगापूर तालुक्यात (Gangapur Taluka) स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swachh Bharat Abhiyan) शौचालयाच्या लाभार्थ्यांनच्या अनुदान (Toilet Subsidy Scam) वाटपात टप्पा दोन मध्ये कोट्यावधी रुपयाचा (Scam worth crores of rupees) अपहार झाल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचा (Accusation) आरोप, धामोरी खुर्द चे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. धामोरी खुर्द येथील अनुदान लाभार्थ्यांवरून हा प्रकार समोर आला आहे, अशी माहिती धामोरी खुर्दचे उपसरपंच रवींद्र चव्हाण (Deputy Sarpanch Ravindra Chavan) यांनी दिली आहे. १७ जानेवारी पर्यंत जर लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान न मिळाल्यास पंचायत समितीला टाळे ठोकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून; शौचालयाला अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या योजनेला गंगापूर तालुक्यासह जिल्हाभरात हरताळ फासला गेल्याची बाब समोर आली आहे.
अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नाही :अनुदानवर्ग झाल्याबरोबर धामोरी खुर्दच्या रवींद्र चव्हाण यांनी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांची अनुदानवर्ग करण्या बाबत त्यांच्याकडे तक्रार केली. गोरगरीब नागरिकांचे स्वच्छता गृहाचे शासनाकडून येणारे प्रत्येकी 12 हजार रुपये अनुदान नागरिकांना या योजनेचा मागमुस ही न लागू देता अधिकाऱ्यांनी अनुदान फस्त केले की काय ? याबाबत शंका उपस्थित होत आहे. याबाबतीत खात्री करणेसाठी अधिक माहिती घेतली असता स्वच्छ भारत अभियान फेस 2 मध्ये गंगापूर तालुक्यातील साधारण 1700 ते 1800 संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात 7223 लाभार्थ्यांना मार्च 2022 मध्ये त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन पेमेंट वर्ग करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकामे केलेले आहे, परंतू प्रत्यक्षात लाभार्थ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. खरे पाहता लाभार्थ्यांच्या खात्यात पीएफएमएस प्रणाली वापरून ऑनलाइन 12 हजार रुपये प्रति लाभार्थी जाणे गरजेचे होते. मात्र तसे न होता. लाभार्थ्यांना या अनुदानाची कुठलीही पूर्वकल्पना न देता संगणमत करून कोट्यावधी रुपयाचा अपहार केल्याचे यावरून निदर्शनास येत आहे.
अनुदान लाटल्याची शक्यता : संपुर्ण औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 7 हजार 223 लाभार्थ्यांचे पैसे वर्ग केल्याचे ऑनलाईन दाखविण्यात आलेले आहे. म्हणजे संपुर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील 7 हजार 223 लाभार्थ्यांचे स्वच्छतागृहाचे अनुदान लाटल्याची शक्यता आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छ भारत अभियान, जिल्हा परीषद, औरंगाबाद यांना चव्हाण यांनी पत्र देऊन कळविले की, जर आपल्या म्हणण्यानुसार उदिष्ट्यपुर्ण करण्यासाठी ऑनलाईन पैसे जमा झाल्याचे दाखविले असेल, व या सर्व प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसेल तर, पुढच्या तीन दिवसांत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करा. परंतु आज जवळपास 3 महीने होऊन देखील पैसे मिळाले नाही.