औरंगाबाद -जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. सकाळी जिल्ह्यातील 36 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी दिवसभरात 399 नवे रुग्ण आढळले होते. शहरात कोरोना तपासणीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. विशेषतः अँटीजेन तपासणी मोठया प्रमाणात केल्या जात असल्याने रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहेत.
सोमवारी सकाळी जिल्ह्यातील 36 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10839 एवढी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6141 एवढी आहे. जिल्ह्यात एकूण 396 जणांचा मृत्यू झालाय. सध्या 4302 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सोमवारी सकाळी औरंगाबाद शहरात 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जामा मस्जिद परिसर (1), लक्ष्मी नगर (2), देवगिरी कॉलनी (1), राजीव गांधी नगर (1), गुरूदत्त नगर गारखेडा (1), या भागातील रुग्ण आहेत.
ग्रामीण भागात 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बकवाल नगर वाळुज (1), पाचोड (1), साबणे टॉकीज परिसर, गंगापुर (5), लासुर स्टेशन (1), शिरसगांव (1), मेहबुब खेडा (1), रेणुका नगर, अजिंठा (1), आंबेडकर नगर, वैजापूर (1), गोल्डन नगर वैजापूर (1), एनएमसी कॉलनी वैजापूर (1), वैजापुर (5), या भागातील रुग्ण आहेत.
औरंगाबाद शहरात दाखल होणाऱ्या प्रमुख मार्गांवर सुरू असलेल्या तपासणी मध्ये 11 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये सुधाकर नगर (1), मिटमिटा (3), जाधववाडी (2), सिध्दार्थ नगर (1), हर्सुल (1), बालाजी नगर (1), बजाजनगर (2), या भागातील रुग्ण आहेत.