महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोनाचे 30 रुग्ण वाढल्याने संख्या 1360; मृतांचा आकडा 59 वर

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृतांची वाढणारी संख्या चिंताजनक ठरत आहे.

aurangabad corona update
औरंगाबाद कोरोना अपडेट

By

Published : May 27, 2020, 10:22 AM IST

औरंगाबाद- जिल्ह्यात बुधवारी 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1360 एवढी झाली आहे. 780 रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन गेले आहेत, तर 59 जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादमध्ये नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये गंगापूर (1), मिसारवाडी (1), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (1), शहानवाज मस्जिद परिसर (1), सादात नगर (1), भवानीनगर, जुना मोंढा (1), जुना बाजार (1), जहागीरदार कॉलनी (2), ईटखेडा परिसर (1), जयभिम नगर (1), शिवशंकर कॉलनी (2), सुभाषचंद्र बोस नगर (4), अल्तमश कॉलनी (1), शिवनेरी कॉलनी एन-9 (1), टिळक नगर (1), एन-4 सिडको (1), रोशन गेट परिसर (1), सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर (1), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (1), भाग्यनगर (1), जय भवानी नगर (3), समता नगर (1), सिल्लोड (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 09 महिला आणि 21 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा उपचार घेऊन जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ही दिलासा देणारी बाब मनाली जात आहे.

कोरोनामुळे मृतांचा वाढत असलेला आकडा ही देखील चिंतेची बाब ठरत आहे. मंगळवारी रात्री दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इंदिरानगर येथील 56 वर्षीय व्यक्ती आणि हुसेन कॉलनीतील 38 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या 59 वर पोहोचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details