महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद : चोरट्यांनी तासाभरात हिसकावली 3 मंगळसूत्र, घटना सीसीटीव्हीत कैद - चोरी

रविवारी अवघ्या एका तासात 3 ठिकाणी मंगळसूत्रे हिसकावत चेन स्नॅचर्सनी पोलिसांना आव्हान दिले आहे. हे चोरटे नागरिकांसमोरून अलगद निघून जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.

चोरट्यांनी तासाभरात हिसकावली 3 मंगळसूत्र

By

Published : Aug 25, 2019, 10:27 AM IST

औरंगाबाद- शहरात दिवसेंदिवस मंगळसूत्र चोरांची दहशत वाढत चालली आहे. रविवारी दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यानी 3 महिलांना लक्ष केले. त्यामधील 2 महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्यात त्यांना यश आले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एका तासात चोरट्यांनी 3 ठिकाणी मंगळसूत्र हिसकवल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रविवारी अवघ्या एका तासात 3 ठिकाणी मंगळसूत्रे हिसकावत चेन स्नॅचर्सनी पोलिसांना आव्हान दिले आहे. हे चोरटे नागरिकांसमोरून अलगद निघून जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. मुळात नागरिकांनी सतर्कतेची भूमिका बजावायला हवी होती. मात्र, बघ्याची भूमिका घेतलेल्या नागरिकांमुळे चोरटे मस्तावल्याचे कॅमेरातील फुटेजमुळे दिसून आले.

चोरट्यांनी तासाभरात हिसकावली 3 मंगळसूत्र

सकाळी तोंडाला कपडा बांधून दुचाकीवर आलेल्या दोघांनी 3 महिलांची मंगळसूत्रे हिसकावली. त्यापैकी 2 महिलांची मंगळसूत्रे चोरांच्या हाती लागली. तर एका महिलेचे मंगळसूत्र लहान असल्याने चोरांना अपयश आले. पहिली घटना सकाळी नऊच्या सुमारास भानुदास नगरजवळ घडली. तनूजा विपुलचंद कंदी या पतीसोबत आकाशवाणीहून घराकडे दुचाकीवर पाठीमागे बसून जात होत्या. त्यावेळी त्यांचा पाठलाग करत दुचाकीवर मागे आलेल्या चोरांनी तनूजा यांच्या गळ्यातील अठरा ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. यावेळी सतर्क असलेल्या तनूजा यांनी मंगळसूत्र हातात पकडल्यामुळे चोरांच्या हाती 11 ग्रॅमचे सोने लागले. तर उर्वरीत 7 ग्रॅम तनूजा यांच्या हातात राहिले. ही घटना घडल्यानंतर तनूजा आणि विपुलचंद यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठत माहिती दिली.

याप्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पावणेदहाच्या सुमारास दुसरी घटना सहकारनगरजवळील एसबीएच कॉलनीतील नाल्याच्या कॉर्नरवर घडली. जयश्री संदीप देवगावकर या जागृती हायस्कुलमध्ये शिक्षीका आहेत. सकाळी मुलाला आयकॉन इंग्लिश शाळेत सोडल्यानंतर त्या दुचाकीने घराकडे निघाल्या होत्या. यावेळी दुचाकीस्वार दोन्ही चोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. शाळेपासून थोड्या अंतरावर चोरांचा मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न फसला. फसलेला प्रयत्न यशस्वी करण्यासाठी चोरांनी पुन्हा पाठलाग सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांनी जयश्री यांना दुचाकीसह थांबवले. त्यांच्याजवळ दुचाकी नेत 17 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. यावेळी 1 रिक्षाचालक बघ्याच्या भूमिकेत होता. जयश्री या आरडा-ओरड करताना हा रिक्षा चालक मदतीला धावून गेला नाही. हा प्रकार घडल्यानंतर जयश्री यांनी उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

याप्रकारानंतर दुचाकीस्वार चोरांनी सातारा परिसरातील बीड बायपासच्या दिशेने मोर्चा वळवला. सकाळी सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास एका महिलेचे 2 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. मनिषा अनिल सोमवंशी यांच्या पतीचे अयप्पा मंदिराजवळील धावडा कॉम्पलेक्समध्ये इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. दररोज सकाळी त्या पतीला कामात मदत करण्यासाठी जातात. आज देखील सकाळी त्या पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र, 2 ग्रॅमचे मंगळसूत्र असल्याने चोरट्याच्या हाताला ते सहज लागले नाही. मंगळसूत्र तुटून खाली पडताच चोरांनी तेथून धुम ठोकली. यावेळी देखील काही तरुण घटनास्थळी उपस्थित होते. एकाच दिवशी अशा 3 घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details