औरंगाबाद- पैठण एमआयडीसीमधील एसबीआय बँक व पिंपळवाडी फाट्यावरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल चोरांना जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. या टोळीला जेरबंद केल्याने जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
पैठणमध्ये बँक आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे अटकेत
दोन महिन्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पैठण औरंगाबाद रस्त्यावरील जैन स्पिनर फाट्याजवळची एसबीआय बँक शाखा इसारवाडी व पिंपळवाडी फाट्याजवळची इंडीकँश कंपनीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
दोन महिन्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पैठण औरंगाबाद रस्त्यावरील जैन स्पिनर फाट्याजवळची एसबीआय बँक शाखा इसारवाडी व पिंपळवाडी फाट्याजवळची इंडीकँश कंपनीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. तब्बल दोन महिन्यानंतर एमआयडीसी पोलिसांना तपासात यश आले आहे.
याप्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या तीनही आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली. अजूनही काही गुन्हे उघडकीस येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.