औरंगाबादमधील अट्टल चोरटा गजाआड; एक किलो चांदीसह 41 ग्रॅम सोने जप्त - thief arrested
घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोराला पकडण्यात उस्मानपुरा पोलिसांना यश आले आहे. या चोराने पाच घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्या ताब्यातून 41 ग्रॅम सोने आणि एक किलो चांदी असे सुमारे 1 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोराला पोलिसांनी पकडले
औरंगाबाद -बंद घरांना लक्ष्य करत सोने-चांदी लंपास कराणाऱ्या आणि पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोराकडून पोलिसांनी तब्बल एक किलो चांदी आणि 41 ग्रॅम सोने जप्त केले आहे. उस्मानपुरा पोलिसांनी ही कारवाई केली. सूर्यकांत उर्फ सनी जाधव (रा. उस्मानपुरा) असे चोरट्याचे नाव आहे.