औरंगाबाद -जिल्ह्यातील बिडकीन तालुक्यातील मोबाईल शॉपीमध्ये चोरी झाली. चोरटे मोबाईल शॉपीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.
औरंगाबादच्या बिडकीनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, मोबाईल शॉपीसह चार दुकाने फोडली
यासह गावातील मिठाई दुकान, इलेक्ट्रिक साहित्याची दुकानासह इतर अजून तीन ते चार ठिकाणी चोरी, आणि चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. मोबाईल शॉपीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने गावकऱ्यांनी ते तपासले असता, चोरटे त्या कॅमऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.
बिडकीन गावात असलेले विराज मोबाईल शॉपी हे दुकान उघडण्यासाठी चालक आले तेंव्हा दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. त्यानंतर त्यांनी आत मध्ये जाऊन पाहिले असता, दुकानातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यासह गावातील मिठाई दुकान, इलेक्ट्रिक साहित्याची दुकानासह इतर अजून तीन ते चार ठिकाणी चोरी, आणि चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. मोबाईल शॉपीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने गावकऱ्यांनी ते तपासले असता, चोरटे त्या कॅमऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.
या बाबत नागरिकांनी बिडकीन पोलिसांना घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी गावात भेट देऊन पाहणी केली. दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने नेमका कोणकोणती वस्तू व किती किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, एकाच रात्री अशा प्रकारे चोरट्यांनी अनेक दुकानांना लक्ष केल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळेस बिडकीन परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.