औरंगाबाद- फनी वादळामुळे मराठवाड्याचे तापमान वाढल्याचे मत खगोल शास्त्रज्ञ आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम खगोल अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले आहे. या वादळामुळेच मराठवाड्यात तापमान पहिल्यांदा नेहमीच्या तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने वाढले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फनी वादळामुळे मराठवाड्यातील तापमान वाढले - खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर - बंगाल
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी हे चक्रीवादळ ओडीसा, बंगलमार्गे पूर्वोत्तर राज्यात सरकल्याने त्याच्या तडाख्यातून महाराष्ट्र वाचला.या वादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. असे असले तरी वादळाचा वेग कमी होईल तसे वातावरण पूर्ववत होईल. फनी वादळामुळे पर्जन्यमानावर परिणाम होणार नाही, असे मत खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले.
औंधकर म्हणाले, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी चक्रीवादळ ओडीशा, बंगलमार्गे पूर्वोत्तर राज्यात सरकल्याने त्याच्या तडाख्यातून महाराष्ट्र वाचला. या वादळाचा कुठलाच परिणाम आता होणार नाही. मात्र, २६ एप्रिलपासून वातावरणात बदल झाला होता. मराठवाड्यात कमाल तापमान ४४ अंशावर तर किमान तापमान ३० अंशांवर पोहोचले होते. हे तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा ३ ते ४ अंशाने वाढले होते. मात्र, आता हे वादळ पूर्वेत्तर राज्यांकडे सरकल्याने तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
या वादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. असे असले तरी वादळाचा वेग कमी होईल तसे वातावरण पूर्ववत होईल. फनी वादळामुळे पर्जन्यमानावर परिणाम होणार नाही, असे मतदेखील औंधकर यांनी व्यक्त केले आहे.