छत्रपती संभाजीनगर - श्रीमंत हे दिवसाला श्रीमंत होत चालले आहेत, तर गरीब हे अजून गरीब होत चालले आहेत. दिवसाला अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केसीआर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेवेळी केला आहे. तसेच त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली आहे. शेतकरी आत्महत्या, पाणी व वीजेचा मुद्दा हा केसीआर यांच्या सभेचा अजेंडा असल्याचे दिसून आले.
देवेंद्र फडणवीस टार्गेटवर - केसीआर यांनी 'अब की बार किसान सरकार'चा नारा दिला. ते पुढे म्हणाले, शेतकरी शेतात जातो, तो आमदार, खासदार का होत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, तुम्ही महाराष्ट्रात कशाला येता. पण मी म्हणालो तेलंगाणासारखे राज्य करा, मी लगचे मध्य प्रदेशात जाईल. तसेच दलीत बंधू सुरू करा, मी महाराष्ट्र सोडून जाईल, असे म्हणत केसीआर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे.
देशाचा विकास करणे गरजेचे - केसीआर म्हणाले की, आपला देश ऐतिहासिक परंपरा असणारा देश आहे. आपल्याला काही ध्येय आहे असे वाटते का? ते हरवले आहे अशी शंका आहे. मी म्हणतो ते ऐकून सोडू नका, त्यावर चर्चा करा. खर खोटं समोर येईल. देशाने आपल्याला ध्येय नसेल तर आपला देश कुठे जाईल, हे कोणाचे पाप आहे. असा प्रश्न केसीआर यांनी विचारला आहे. ते पुढे म्हणाले की, नवे लक्ष नवीन सकाळ घेऊन पुढे जावं लागेल. आपल्या देशाचा विकास आपल्याालाच करावा लागणार आहे. आपला देश बदलण्यासाठी इतर देशाचे नागरिक येणार नाहीत. त्यामुळे आपल्यालाचा आपल्या देशाचा विकास करावा लागेल.
प्रत्येक घराघरात पाणी देणार - महाराष्ट्रातल्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, इतक्या नद्या असून काय उपयोग. आर्थिक राजधानी मुंबई आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आम्ही चंद्र, तारे मागत नाहीत, फक्त पाणी मागत आहोत. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा, आम्ही राज्यातील प्रत्येक घराघरात पिण्याचे पाणी देणार, असे आश्वासन तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी संभाजीनगर येथील सभेत दिले.