औरंगाबाद - आंबेडकरनगरमध्ये एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हा नैसर्गिक मृत्यू नसून सासर मंडळींच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने घाटी रुग्णालयात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शाहीन सय्यद रईस सय्यद (वय 25 आंबेडकरनगर,औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
औरंगाबादमध्ये विवाहितेच्या हत्येचा संशय; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार - married women
आंबेडकरनगरमध्ये एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हा नैसर्गिक मृत्यू नसून सासर मंडळींच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
औरंगाबाद
हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. या प्रकरणी सध्या सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल,अशी माहिती उपनिरीक्षक पी.जी.अबूज यांनी दिली आहे.