महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण यांची नियुक्ती - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बातमी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत सह-व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेले सुनील चव्हाण यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली आहे.

sunil chavan
सुनील चव्हाण

By

Published : Aug 17, 2020, 7:01 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण यांची उत्सुकता संपली असून सुनील चव्हाण यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच उदय चौधरी यांची मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे हे पद रिक्त होते.

यापूर्वी सुनील चव्हाण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत सह-व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. त्यांची आता औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आली असून त्यांना त्वरित जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारावा, असे देखील अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या सहीने निघालेल्या आदेशात म्हटले आहे.

सुनील चव्हाण यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून एमएससी अग्री आणि व्यवस्थापन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 3 एप्रिल, 2020 रोजी महावितरणच्या सहाय्यक संचालकांचा त्यांनी पदभार स्विकारला होता. आता औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाची जवाबदारी शासनाने त्यांच्यावर सोपवली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रीत ठेवण्याचे आव्हान देखील त्यांच्या समोर मोठ्या प्रमाणात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details