औरंगाबाद :स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने दुपारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जटवाडा रोडवरील तलावानजीक घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश देविदास गायकवाड (२३) रा. एकतानगर, असे मृत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट -
सुरेश हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह रिक्षा चालवायचा. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. सध्या तो आई आणि भावासह भाड्याच्या खोलीत राहत होता. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सुरेशने आपट्याच्या झाडाला कपड्याने बांधून गळफास घेतल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळाल्यावर बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरेशला बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
हेही वाचा- '१२ आमदारांवर कोणते संशोधन सुरु आहे?'