औरंगाबाद- वृक्ष तोड करताना नियम पाळले जात नाही. त्यामुळे आता हे नियम कठोर करून झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच नियम न पाळणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मराठवाडा वनविभागासोबत शहरातील वाल्मी विभागात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
वृक्षतोड करताना नियम न पाळणाऱ्यांना मिळेल तुरुंगाची हवा - मुनगंटीवार - मराठवाडा वनविभाग
३० टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र असलेल्या ठिकाणी टँकर लागत नाही. त्यामुळे मराठवाड्यात जंगलांची वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता वनशेतीला प्राधान्य दिले जात आहे. कुणाल्याही फळ उत्पादन योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यासंबंधीत सुचनाही वनविभागाला केल्या असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

वनविभागाद्वारे राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना झाडे लावण्याचे प्रोत्साहन दिले जात आहे. नुकताच जन्म झालेल्या मुलीच्या नावे झाडे लावणाऱ्या शेतकऱ्यांना साग आणि फळ झाडे मोफत दिले जात आहे. जपानचे मियामाकी तंत्रज्ञान वापरून आता शहरात देखील घनदाट जंगल उभारण्याचा निर्णय घेतला. या योजनेचे 'अटल आनंदवन' योजना असे नाव ठेवण्यात आले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच मराठवाड्यातील जनतेने वृक्ष लागवड मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.