महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुनगंटीवार औरंगाबादेत म्हणाले; लोकसभेत काही वाघ घायाळ झाले, ते भाजपच्या बंदुकीने नाही... - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद शाखेचा शिवसेनेच्या वर्धापन दिनी चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पराभवाचे शल्य बोलून दाखवले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी युतीचे काम केले नाही, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र, आता त्यांची नाराजी दूर करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवले आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

By

Published : Jun 11, 2019, 11:34 AM IST

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत काही वाघ घायाळ झाले आहेत. मात्र, योग्य वेळी त्यांच्या जखमा बऱ्या केल्या जातील, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता केले आहे. ते शहरातील वाल्मी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

वाघ घायाळ करायला भाजपची बंदुक वापरलेली नाही. मात्र, ज्यांनी ही बंदुक वापरली त्यांनी बंदुक भाजपचा असल्याचा कांगावा केला. मात्र, वाघाला घायाळ करण्यात भाजपचा कोणी कार्यकर्ता जबाबदार असेल, तर त्याला पक्षात राहण्याचा अधिकार नाही, असा अप्रत्यक्ष टोला मुनगंटीवार यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लगावला की काय? अशी चर्चा औरंगाबादेत सुरू झाली आहे.

रावसाहेब दानवे यांनी सासरेधर्म पाळला असल्याचे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले होते. दानवे यांनी चंद्रकांत खैरेंच्या पराभवासाठी जावई हर्षवर्धन जाधव यांना अपक्ष निवडणूक लढवायला लावली. त्यानंतर त्यांनी युतीधर्म न पाळता जावयाला मदत केली असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. या निवडणुकीत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. त्यामुळे रावसाहेब दानवे चंद्रकांत खैरेंच्या पराभवासाठी जबाबदार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

औरंगाबाद शाखेचा शिवसेनेच्या वर्धापन दिनी चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पराभवाचे शल्य बोलून दाखवले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी युतीचे काम केले नाही, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र, आता त्यांची नाराजी दूर करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवले आहे.

'हे' लोकसभेत घायाळ झालेले शिवसेनेचे वाघ -

  1. रायगड लोकसभा मतदारसंघ : अनंत गीते
  2. शिरूर लोकसभा मतदारसंघ : आढळराव पाटील
  3. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ : चंद्रकांत खैरे

ABOUT THE AUTHOR

...view details