औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजेपासून राज्यभरामध्ये सुरुवात झाली. सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.
राज्यमंत्री अतुल सावे यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क - maharashtra assembly polls
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजेपासून राज्यभरामध्ये सुरुवात झाली. सकाळी ७ वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे, एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी ७ वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे, एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, यांच्यासह काँग्रेसचे कल्याण काळे, शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला.
सकाळीच मतदान केल्याने दिवसभर मतदान केंद्रावर नागरिकांच्या भेटीगाठी घेता याव्यात, अशी लवकर मतदान करण्यामागे नेत्यांची भावना असते. सकाळी ७ वाजता राज्यमंत्री अतुल सावे यांनी खडकेश्वर येथे जाऊन आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले. विकासकामे केल्याने नागरिकांचा जनाधार मिळेल, असा विश्वास राज्यमंत्री सावे यांनी व्यक्त केला, तर मतदान आपला हक्क असून तो सर्वांनी बजावावा, असे आवाहन सावे यांच्या कुटुंबीयांनी केले. यावेळी अतुल सावे आणि त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.