औरंगाबाद - मोबाईलवर बोलणे एका नवविवाहितेच्या जीवावर बेतले आहे. रोजगारासाठी मध्यप्रदेशहून औरंगाबादेत आलेल्या २५ वर्षीय नवविवाहितेचा फोनवर बोलताना गच्चीवरून पडून मृत्यू झाला. या तरुणीचा ३ महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला होता.
मृत मुस्कान रामअवतार कुर्मी मुस्कान रामअवतार कुर्मी (वय-25 रा.केर्वाना, जि.दमोह, राज्य. मध्यप्रदेश, ह.मु.गंगापूर जहागीर अष्टविनायक कॉलोनी, शेंद्रा ) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे.
मृत मुस्कान आणि रामअवतार या दोघांचे प्रेम होते. दोघांनी ३ महिन्यापूर्वीच घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह केला होता. त्यानंतर हे नवदाम्पत्य आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने पाहत रोजगारासाठी औरंगाबाद शहरानजीकच्या शेंद्रा या पंचतारांकित एमआयडीसीत आले. तेथे रामवतार खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करीत होते. चांगला पगार मिळत असल्याने दोघेही आनंदी होते. मात्र, हा आनंद काही महिन्यांपूरताच ठरला.
औरंगाबादेत मोबाईलवर बोलणे बेतले नवविवाहितेच्या जीवावर मुस्कान ही ५ जूनला भाड्याच्या घरात राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर उभी राहून सासुशी फोनवर बोलत होती. त्यावेळी अचानक तोल गेल्याने ती जिन्यावरून खाली पडली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुस्कानची प्राणज्योत मालवली. ही घटना शेंद्रा एमआयडीसीत घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.