औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबादमधील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणदेखील वाढले आहे. शुक्रवारी दुपारी एकाचवेळी सहा कोरोना रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दिलासादायक! औरंगाबादेत एकाच दिवशी सहा रुग्ण कोरोनामुक्त - corona patients recovered
जिल्ह्यातून उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता 22 वर पोहोचली आहे. औरंगाबादेत कोरोनाची रुग्ण संख्या 40 आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 22 रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 13 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातून उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता 22 वर पोहोचली आहे. औरंगाबादेत कोरोनाची रुग्ण संख्या 40 आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 22 रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 13 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. ज्यामध्ये 11 जिल्हा रुग्णालयात तर 2 जण घाटी रुग्णालयात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
आज कोरोनामुक्त झालेल्या ६ जणांमध्ये देवळाई येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा, यादवनगर येथील 29 वर्षीय युवक, किराडपुरा येथील 11 वर्षीय मुलगी आणि 33 वर्षीय महिलेचा तर जलाल कॉलॉनीतील 17 वर्षीय मुलाचा समावेश आहे. उपचारानंतर या सर्वांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. या सर्वांना निरोप देत असताना जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी फुले देऊन त्यांचे अभिनंदन केले. उपचार पूर्ण झालेल्या या सहा रुग्णांनी डॉक्टरांचे आभार मानले. आतापर्यंत 22 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले असल्याने जिल्ह्यासाठी ही चांगली बाब असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.