औरंगाबाद -आईवडिलांचे छत्र हरविलेल्या 15 वर्षीय मुलीवर मानलेल्या भावानेच आत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास रामजी प्रसाद ऊर्फ पल्ला दादा (25) असे आरोपीचे नाव आहे.
पीडिता आणि आणि बहिणी शहरात राहतात. पीडितेची मोठी बहिण ही आरोग्य क्षेत्रात नोकरी करते. त्यांच्या आईचे निधन 11 वर्षापूर्वी तर वडिलांचे निधन 4 वर्षांपूर्वी झाले. प्रसाद नामक व्यक्तीला दोघींनी आपला भाऊ मानलं होतं. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी त्याला राखीही बांधली. यानंतर तो पीडितेला आपल्यासोबत व्यायाम करण्यासाठी घेऊन गेला. मात्र, मैदानावर जाण्याचा रस्ता बदलत त्याने मित्राच्या कारने बायपासला रेल्वे पटरीच्या पलीकडे असलेल्या त्याच्या खोलीवर गेले. तिथे तिला व्यायाम करायला लावला आणि मालिश करतो म्हणत तिच्यावर अत्याचार केला. सदरचा प्रकार कोणास सांगीतल्यास चित्रकरण केले असून ते व्हायरल करेल, अशी धमकी दिली.
त्यामुळे घाबरलेल्या मुलीने कोठेही याची वाच्यता केली नाही. मात्र, दोन दिवसांनी त्रास होऊ लागल्यानंतर मोठ्या बहिणी तिला रुग्णालयात घेऊन गेली. तेव्हा हा प्रकार समोर आला. डॉक्टरांनी पोलिसांत जाण्याचा सल्ला दिल्यानंतर समाजसेविका सुकन्या भोसले यांनी पीडितेला धीर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.