औरंगाबाद- कन्नड़ तालुक्यातील चापानेर येथे अवैधरित्या मटका चालवणाऱयांवर कारवाई करण्यासाठी एका व्यक्तीने तेथील भारत संचार निगमच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. दादासाहेब पवार असे या व्यक्तीचे नाव असून आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अवैध मटका बंद करण्यासाठी कन्नड तालुक्यात 'या' पठ्ठ्याने केले 'शोले स्टाईल' आंदोलन
चापानेर येथे अवैधरित्या मटका चालवणाऱयांवर कारवाई करण्यासाठी एका व्यक्तीने तेथील भारत संचार निगमच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. दादासाहेब पवार असे या व्यक्तीचे नाव आहे.
शोले स्टाईल आंदोलन
हेही वाचा -पैठण उपविभागीय पोलीस अधीक्षकांवर पाळत ठेवणारे वाळू तस्कर पोलिसांच्या ताब्यात
दादासाहेब यांनी सांगितले की, कन्नड़ पोलिसांच्या कृपेने अवैधरित्या मटका चालत असतो. त्यामुळे मी त्रस्त झालो आहे. म्हणून मी टाॅवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. अवैध मटका बंद करण्यासाठी पहिल्यांदाच कन्नड़ तालुक्यात शोले स्टाईल आंदोलन करावे लागले. यावर कारवाई केली जाते की नाही हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Last Updated : Nov 14, 2019, 3:21 PM IST